Type to search

नंदुरबार

नवापूर पालिका कर्मचार्‍यांच्या आंदोलनानंतर आरोपींना अटक

Share

नवापूर । नवापूर पालिकेच्या कर्मचार्‍याला मारहाण प्रकरणी अधिकारी कर्मचार्‍यांनी कामबंद आदोलन करून तहसिल कार्यालयावर मार्चा काढत निवेदन दिले. दुपारी आरोपींना अटक झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नवापूर येथे पाणी वाटपास गेलेल्या नगरपरिषद कर्मचारी वाहन चालक राजेश गावीत व सहकारी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली या बाबत नगरपालिकेतील महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना व नवापूर नगरपरिषद कर्मचारी,अधिकारी संघटना यांनी नवापूर नगरपालिके समोर बसुन कामबंद आंदोलन केले.आरोपींना अटक करत नाही,तो पर्यंत आम्ही काम सुरु करणार असा पवित्रा घेतला या नगराध्यक्ष हेमलता पाटील यांना निवेदन दिले. यावेळी नगरसेवक आरीफ पालावाला, दर्शन पाटील, विशाल सांगळे आदी उपस्थित होते या नंतर मोर्चा काढत तहसील कार्यालयात जाऊन निवेदन तहसीलदार सुनिता जर्‍हाड यांना दिले.

निवेदनावर मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे, जिल्हाअध्यक्ष राजेंद्र सैदाने, उपाध्यक्ष मनोज पाटील, अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणे उपाध्यक्ष कमलाबाई पवार, कोषाध्यक्ष अनंत पाटील, कार्यालय अधिक्षक अनिल सोनार, मिलिंद भामरे, आनंद साळवे, युवराज पानपाटील, हरीन अटालीया, अशोक दंडोरीया, प्रेमानंद गावीत, सुधीर माळी, सतिष बागुल, सचिन अग्रवाल, प्रशांत भट, वामन अहिरे, राजु गावीत, राजेंद्र चव्हाण,नथ्थु अहिरे,अशोक पवार,श्रीमती पुष्पाबाई सोलंकी, भरत सोनार, दिलीप मराठे,गिरीष सांगळे,सुदाम नरभवर,जगदीश पेंढारकर,सलीम पठाण,अजय तांबोळी, प्रविन सामुद्रे, बुधाजी पाटील,विजय पाटील, आतिष पाटील आदी कर्मचारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.दुपारी सहायक पोलीस निरिक्षक दिंगबर शिंपी यांनी दोघा आरोपींना अटक केली.या नंतर दुपारी 2 वाजता नवापूर पालिकेचे सर्व कर्मचारी यांनी काम सुरु केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!