Type to search

नंदुरबार

नवापूरच्या जनतेला पर्याय हवा म्हणून आपला विजय निश्चित : भरत गावित

Share

नवापूर । ता.प्र. – नवापूर मतदार संघातील जनतेला स्थानिक पातळीवर रोजगार हवा आहे. शेतीला पाणी हवे आहे. गावापर्यंत किमान रस्ते हवे आहेत. स्थानिक पातळीवर समस्या सुधाराव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेला आता पर्याय हवा आहे, म्हणून नवापूर मतदार संघात आपला विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास भाजपाचे उमेदवार भरत गावित यांनी व्यक्त केला.

श्री.गावित म्हणाले, तालुक्यात राजकारण करतांना मी व आधी माझा वडीलांनीही कधी सुडाचे राजकारण केले नाही. याउलट लोकसभेची उमेदवारी मला मिळू नये, म्हणून नवापूरमधून सिग्नल गेला आमच्या गावीत परिवाराचे राजकीय अस्तित्व संपविण्याचे राजकारण झाले. मात्र, आमचे राजकारण संपविणारेच कधीकाळी आपल्या वागण्यामुळेच संपतील, हे आता जनताच सांगत आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतांना अडीच वर्षात व त्यानंतर सलग मतदार संघाशी नाळ जोडून ठेवली आहे. मी करंजी गटातून, तर पत्नी संगीता गावित रायंगण गटातून सदस्य आहेत. त्यामुळे मतदारांशी असलेला सुसंवाद व जनतेची केलेली कामे हे आपल्या निवडणुकीचा आशिर्वाद म्हणून मतदार मतदारातून देतील, असा मला विश्वास आहे.

आदिवासी कारखान्यातील हुकूमशाही व भ्रष्टाचार संपला पाहिजे, हा कारखाना नवापूर तालुक्याच्या दृष्टीने रोजगार व सहकार क्षेत्रात मानाचा बिंदू आहे. आणि त्याच कारखान्यातूनच ऊस उत्पादक शेतकरी फसविला जात आहे, यापेक्षा दुर्दैव दुसरे काही नाही. ऊसतोड कामगारांना पगार नीट दिला जात नाही. आपण शेतकरी व कामगारांसाठी लढा द्यायला तयार आहे. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांना मतदार नक्कीच जागा दाखवतील. विद्यमान लोकप्रतिनिधींनी एकही आमसभा घेतली नाही. जनतेचे प्रश्न काय आहेत. ते जाणून घेतले नाहीत. केवळ सत्तेचे राजकारण केले. समाजकारण बाजूला राहिले. त्यामुळे जनता दाद मागविण्यासाठी, प्रश्न मांडण्यासाठी आपल्याकडे हक्काने येत असत. जसा जनतेचा माझ्यावर अधिकार आहे. तसा जनताही सत्तेचा अधिकार आपल्याला मतदानाचा माध्यमातून देतील, यात शंका नाही, असेही ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!