Type to search

नंदुरबार

नवापुरात 37 मतदान केंद्र छायाचित्रण व सूक्ष्म निरीक्षकांच्या कक्षेत- शेलार

Share

नंदुरबार । नवापूर विधानसभा मतदार संघात निवडणुक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असुन मतदार संघात 37 मतदान केद्रावर पुर्ण वेळ कँमेर्‍यांद्वारे छायाचित्रण केले जाणार आहे. तर 26 केद्रावर सुक्ष्म निरिक्षक कार्यरत असतील अशी माहिती देत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावुन राष्ट्रीय कर्तव्यात सहकार्य करावे असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे

निवडणुक प्रक्रिये संदर्भात माहीती देण्यासाठी तहसील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.नवापूर विधानसभा मतदान केद्रात एकुण 336 मतदान केद्र असुन 2 लाख 87 हजार 922 मतदारांपैकी 1 लाख 40 हजार 572 पुरुष व 1 लाख 47 हजार 349 महिला मतदार आहेत. 37 मतदान केद्र ही पूर्ण वेळ सीसीटीव्ही कँमेरा चित्रीकरणात राहणार असून त्याचे थेट प्रक्षेपण तहसील कार्यालयासह निवडणुक आयोगाकडे होणार आहे. 26 मतदान केंद्रावर सुक्ष्म निरिक्षक कार्यरत राहणार असून मतदान केद्रावरील कामकाजाचा थेट अहवाल ते सुक्ष्म निरिक्षकांकडे सादर करणार आहेत. मतदान केद्रावर मतदान साहित्य व कर्मचार्‍यांना पोहचविण्यासाठी प्रशासनाने 100 जीपगाड्या व 30 एस टी बसेस व 3 ट्रकांची व्यवस्था केली आहे. एकुण 1850 मतदान कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 1 हजार 22 पोस्टल मतपत्रिका कर्मचार्‍यांना देण्यात आल्या असून 298 प्राप्त झाल्या आहेत. दि 21 आँक्टोबर सोमवार रोजी सकाळी 7 वाजेपासुन मतदान सुरु होणार असुन दि 24 आँक्टोबर गुरुवार रोजी प्रत्यक्ष मतमोजणी नगर परिषद येथे होईल .मतदानाला जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हायचे असुन मतदान ओळखपत्र शिवाय शासन प्रमाणीत अन्य ओळखपत्रे सोबत न्यायची आहेत.मतदान चिठ्ठी ही ओळखपत्र म्हणुन चालणार नाही.असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मतदान केद्रात भ्रमणध्वनी नेण्यास किवा कुठल्याही प्रकारे छायाचित्रण करण्यास कायद्याने बंदी असून गैरप्रकार करणारा कायदेशीर कारवाईस पात्र राहील असे संकित दिले. सर्वच ठिकाणी मतदान यंत्रणा लक्ष ठेवु शकत नाही म्हणुन आदर्श मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नागरीकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणुन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.तसेच मतदान यंत्रात कुठल्याही प्रकारे गडबड होत नाही.प्रत्यक्ष मतदानापुर्वी उमेदवार प्रतिनिधीचा उपस्थितीत त्याची पडताळऩी केली जाते यांची मतदारांनी नोंद घेऊन अफवांवर विश्वास न ठेवता निर्भय पणे मतदान करावे असे महेश शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साघतांना सांगितले.यावेळी तहसीलदार सुनीता जर्‍हाड, नायब तहसीलदार राजेंद्र नजन उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!