नवनिर्वाचित जि.प. अध्यक्षांचा राज्यमंत्र्यांकडून सत्कार ; पंजा आणि धनुष्यबाणाचा एकत्र जल्लोष

0

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे या विराजमान झाल्या. शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य नाशिक जिल्हा परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे अनेक पदाधिकारी जिल्हा परिषद आवारात ठाण मांडून होते.

अध्यक्षपदी शीतल सांगळे विजयी होताच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडून विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, निफाडचे आमदार अनिल कदम तसेच शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, सुहास कांदे यांच्यासह अनेक पदाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी हजर झाले होते.

कॉंग्रेससचा उपाध्यक्ष झाल्यामुळे निवडनुकीनंतर शिवसेना आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष जिल्हा परिषद आवारात केला होता.

LEAVE A REPLY

*