नवनिर्वाचित जि.प.अध्यक्षांकडून कामकाजाची माहिती ; खातेप्रमुखांबरोबर चर्चा, पदभार सोपस्कार पुढे ढकलला

0

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा शीतल सांगळे यांनी दूपारी जि.प.मुख्यालयात हजेरी लावत, खातेप्रमुखांशी चर्चा केली. कामकाजाची माहिती घेतली मात्र, पदभार घेण्याचा सोपस्कार पुढे ढकलला.

जिल्हा परिषदेत लाल दिव्याच्या गाडीतून दूपारी चार वाजेच्या दरम्यान अध्यक्षा सांगळे यांचे आगमण झाले. त्यावेळी त्यांनी थेट अध्यक्षा कक्ष गाठून तेथे जिल्हा परिषदेचे कृषी विभाग, शिक्षणाधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा, ल.पा. पूर्व पश्चिम, आरोग्य, ग्रामीण स्वच्छता, पाणी पुरवठा अधिकार्‍यांना बोलावून कामकाजाबदल जाणून घेतले. त्यामुळे गेले अडीच महिने सुनसान असलेला जि.प.अध्यक्ष दालन आज उपस्थितांच्या गर्दीने गजबजून गेले होते.

जि.प.अध्यक्षांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन हितचिंतकांनी गर्दी केलेली होती. त्याचबरोबर अधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.

यावेळी काही खात्यांची माहिती अ‍ॅन्टी चेंबरमध्ये घेण्यात आली. तर अभिनंदनासाठी खास करून सिन्नरमधील कार्यकर्त्यांची आणि पदाधिकार्‍यांची रिघ अध्यक्षांच्या कक्षात होती.

LEAVE A REPLY

*