नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर येणार चित्रपट…१७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार!

0

पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवला जाणार आहे.

एक सामान्य चहावाला ते पंतप्रधान बनण्याचा त्यांचा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव हूँ नरेंद्र मोदी बनवा मांग छू असे असून हा चित्रपट गुजराती भाषेत असणार आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल नरयानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी आजवर अनेक गुजराती आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक अनिल नरयानी सांगतात, या चित्रपटामध्ये नरेंद्र मोदी यांच्या संघर्षाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण पूर्ण झालेले आहे.

हूँ नरेंद्र मोदी बनवा मांग छू या चित्रपटात तीन गाणी असणार आहेत.

हा चित्रपट १७ नोव्हेंबरला गुजरातमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट इतर भाषांमध्ये देखील डब करण्यात येणार आहे.

या चित्रपटात ओमकार दास, अनेशा सयैद, करण पटेल आणि हिराल यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पवन पोद्दार आणि तान्या शर्मा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

या चित्रपटात नरेंद्र मोदींच्या भूमिकेत प्रेक्षकांना ओमकार दासला पाहायला मिळणार आहे. ओमकारने पिपली लाईव्ह या चित्रपटात काम केले होते.

LEAVE A REPLY

*