Thursday, April 25, 2024
Homeनगरनगर – हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांनी बनवला रुग्णांसाठी स्वयंपाक

नगर – हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांनी बनवला रुग्णांसाठी स्वयंपाक

अहमदनगर – आज संपूर्ण जगात “कोरोना” विषाणुने धुमाकुळ घातला आहे. यामुळे देशात 21 दिवसांची संचारबंदी आहे .अत्यावश्यक सेवा वगळता अहमदनगर जिल्हा संपूर्ण बंद आहे. जिल्ह्यामधून शहरात हाॕस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या दोन वेळच्या जेवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील सर्व हॉटेल्स आणि खानावळी बंद आहेत. रुग्णाची व नातेवाईक यांची गैरसोय टाळण्यासाठी येथील विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व अथर्व टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्यावतीने अभिनव उपक्रम राबविला आहे. हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजन तयार करण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व महिला डॉक्टरांनी परिचारिका आणि महिला कर्मचारी यांना सोबत घेऊन रुग्णसेवेबरोबरच मागील काही दिवसांपासून स्वतःच्या हाताने रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वयंपाक करण्याचे काम हाती घेतले आहे. विघ्नहर्ता हॉस्पिटलसोबतच आणखी काही हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी देखील हि सुविधा पुरविण्यात येत आहे. या उपक्रमातून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या कामी नगर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी देखील मोलाचे योगदान दिले आहे.

- Advertisement -

यासाठी विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या संचालिका स्ञीरोग तज्ञ डॉ . सुप्रिया वीर, डॉ.निलोफर धानोरकर , हृदयरोग तज्ञ् डॉ.प्राजक्ता पारधे, अस्थिरोगतज्ञ् डॉ .महेश वीर , डॉ . अमित कुलांगे, डॉ . अखिल धानोरकर, न्युरो सर्जन डॉ . प्रशांत जाधव , प्लास्टिक सर्जन डॉ.नरेंद्र मरकड, भूल तज्ञ् डॉ. निस्सार सय्यद, डॉ.महादेव रंधाळे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.सीताराम काकडे, मॅनेजिंग डायरेक्टर अरविंद डिक्कर व सहकारी गौतम आढाव, शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी किशोर मुनोत, हरजीतसिंग वाधवा, श्री.सोहनी,श्री नारंग, श्री.रपारिया, अमित लोंढे हे या कामी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या या उपक्रमाचा आदर्श सर्वांनीच घ्यावा, असे आ.संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या