नगर बायपाससाठी 17 कोटी

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असणार्‍या नगर बाह्य वळण रस्त्यासाठी अखेर 17 कोटी 72 लाख 62 हजार रुपये मंजूर झाले आहेत.

विळद बाह्यवळण रस्त्यामध्ये अनेक मोठे खड्डे पडल्याने बायपासवरील वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहनांची संख्या वाढल्याने गर्दी अधिक होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

बायपास रस्त्याची दुरुस्ती झाल्यास महामार्गावरील वाहतूक वाढणार आहे. जिल्हा राज्य क्षेत्राकडील सन 2017-18 मध्ये द्विवार्षिक करारा अंतर्गत 17 कोटी 72 लाख 62 हजार रुपये किंमतीच्या कामास पुढील अटींच्या अधिन राहून करण्यात करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*