नगर जिल्हा बँकेतील कर्मचार्‍यांना पगारवाढ

0

युनियन व बँक यांच्यामध्ये पाच वर्षांसाठी करार

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा सहकारी बँकेतील कर्मचार्‍यांना पगारवाढीचा करार बँक व कर्मचारी प्रातिनिधीक संघटना यांच्यात गुरुवार11 मे रोजी झाला. दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉईज युनियन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात बँकेतील 1 हजार चारशे कर्मचार्‍यांना साधारणत: 7 कोटी रुपयांची वार्षिक पगारवाढ देण्याबाबतचा करार झाला.
करारावर युनियनच्यावतीने कार्याध्यक्ष धनंजय भंडारे, जनरल सेक्रेटरी मधुकर खेडकर, सह सचिव मधुकर पठारे, मुरलीधर कुलकर्णी व बँकेच्या संचालक मंडळावरील कर्मचारी प्रतिनिधी भरत इथापे, सुभाष घुले तर बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक आ.शिवाजीराव कर्डिले, अण्णासाहेब म्हस्के, सुरेश करपे, रावसाहेब शेळके, जगन्नाथ राळेभात, अंबादास पिसाळ आदी संचालक उपस्थित होते.

3 ते 9 हजारांपर्यंत वाढ
जनरल मॅनेजर साधरणत: 9 हजार रु. ते शिपाई श्रेणी यांना 3 हजार पाचशे रुपयांची श्रेणीनिहाय वेतनवाढ करारान्वये मंजूर करण्यात आली आहे. करार हा पाच वर्षांसाठी असून तो एप्रिल 2016 पासून पूर्वलक्षीप्रमाणे करण्यात आलेला आहे. तसेच पगारवाढी व्यतीरिक्त कर्मचार्‍यांना विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.  

LEAVE A REPLY

*