नगरसूलला शाॅक सर्किटने दीड एकर गव्हाची राख

0

राजापुर (लक्ष्मण घुगे) : येवला तालुक्यातील नगरसुल येथील कुडके वस्तीवर राधाकीसन मथु कुडके यांच्या शेतात लाईटच्या तारा ऐकमेकाना चिटकल्याने शाॅक सर्किट झाले. यात प्रचंड आगीचे लोळ तयार होऊन आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले. भर उन्हात लागलेल्या आगीने राधाकीसन मथु कुडके व भाऊलाल रामभाऊ कुडके यांचे प्रतेकी 25 -25 गुंठे गहु जळुण खाक झाला.

वारा जास्त असल्याने गव्हाच्या शेतातली आग काही क्षणातच शेजारील डोंगरालादेखील लागली. आगीचे लोळ बघून आसपासच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. आगीमुळे यशवंत रामभाऊ कुडके, भाऊलाल कुडके यांचे घर पेटण्यापासून वाचवले.

ह्या घटनेची माहीती मोबाईल द्वारे वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेची गांभीर्यता लक्षात घेता विज वितरण कंपनीचे नगरसुल सबस्टेशनचे इंजिनियर धनंजय पाटील व त्याच्या कर्मचार्यानी घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

नगरसुल कामगार तलाठी के.के.सुलाने यांनी व त्यांचे सहकारी यांनी घटना स्थळाचा पहाणी करुण पंचनामा केला. जवळपास ३० क्विटल गहु जळण खाक झाला. ही आग विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाने लागली असल्याची मागणी केली आहे.

कारण गेल्या काही दिवसांपासून तारा नेहमी चिकटतात म्हणून वितरण कंपनीचे अधिकारी यांना वांरवार दिली होती. अनेकदा वायरमन येऊन पाहणी करून कामदेखील केले त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला कारणीभूत ठरवत आरोप केला आहे.

LEAVE A REPLY

*