नगरमध्ये पुन्हा चलन कोंडी

0

कॅशलेस धोरणामुळे बँका, एटीएममध्ये खडखडाट

अहमदनगर (प्रतिनिधी) – नोटाबंदीच्या घोषनेनंतर पूर्वपदावर आलेले व्यवहार पुन्हा कोलमडत असल्याचे चित्र आहे. नगर शहरात आणि ग्रामीण भागात पुन्हा एकदा नोटांची टंचाई निर्माण झाली आहे. बँकांमधून ग्राहकांना आठवड्यातून एकदाच ठरावीक रक्कम देण्यात येत असल्याने टंचाई बँकांची असल्याचा आरोप होऊ लागला आहे. नागरिकांनी दोन हजार, पाचशेच्या नोटांचा साठा केल्याने चलनकोंडी झाली असल्याचे स्पष्टीकरण बँकांनी केले आहे. केंद्र सरकारचे धोरण कॅशलेस व्यव्हाराचे असून ते झाल्यास नोटांची टंचाई होणार नाही, असे बँकेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा अचानक चलनातून बाद करून देशातील जनतेवर काळ्या पैशांच्या नावाखाली सर्जिकल स्ट्राइक कले होते. त्यानंतर जवळपास दोन ते अडीच महिने नागरिकांना नोटांच्या टंचाईला सामोरे जावे लागले होते. या काळात जनतेनेही काळा पैसा बाहेर येणार आहे, यामुळे अडचणी निर्माण झाल्या तरी निमूटपणे सहन केल्या होत्या.

या काळामध्ये उद्योग व व्यवसाय यांच्यामध्ये मात्र मंदीचा लाट आली होती.
नोटाबंदीनंतर नवीन नोटा छापण्यास वेळ लागल असल्याने नोटा मागणीप्रमाणे मिळत नव्हत्या; मात्र, आता तसे कोणतेही कारण नसतांना बँका, पतसंस्था व त्यांचे खातेदार यांना देण्यात येत असलेल्या रोख रकमेवर पुन्हा एकदा मर्यादा आणली आहे. आता पुन्हा प्रत्येक खातेदारास बँका आठवड्याला ठरावीक रोकड देत आहे. बँकांमधून नागरिकांना देण्यात येणार्‍या पैशावर पुन्हा एकदा मर्यादा का आणण्यात आल्या आहेत, अशी विचारणा आग्रीण बँकेच्या व्यवस्थापक दायमा यांना केली असता त्यांनी मार्केटमध्ये गेलेल्या नोटा पाहिजे त्या प्रमाणात पुन्हा बँकेत आल्याच नाहीत. यामुळे पुन्हा चलन कोंडी होण्यास सुरूवात झाली आहे. नागरिकांनी जास्ती जास्त कॅशलेस पध्दतीने व्यवहार करणे आवश्यक आहे. केंद्र सरकार आणि रिर्झव्ह बँकेला देखील हे अपेक्षीत आहे. नागरिकांनी स्वत:कडे नोटा जमा केल्यास त्याचा तोटा इतरांना सहन करावा लागणार असल्याचे सांगितले.

एटीएमसमोर ‘नो कॅश’चे बोर्ड
पुन्हा एकदा नोटांची टंचाई निर्माण झाल्याने नागरिक एटीएमकडे जात आहेत; मात्र, सर्व बँकाच्या एटीएममध्ये सध्या केवळ नो कॅश एवढेच नागरिकांना पाहवे लागत आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहेत व याचा पुन्हा एकदा सर्व बाजारपेठेवर परिणाम होणार, असे आहे. तसे झाले तर मात्र याचे दुरोगामी परिणाम भोगावे लागतील असे तज्ज्ञ सांगत आहेत. शहरात जवळपास 100 पेक्षा जास्त एटीएम मशीन आहेत. यातील बहूतांशी एटीएममध्ये सध्या खडखडाट असल्याचे मंगळवारी दिसून आले

केंद्र सरकारचे धोरण नागरिकांनी जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करावा, असे आहे. मात्र ज्यांनी मोठ्या प्रमाणात बँकेतून नोटा काढल्या त्यातील बहूतांशी जणांनी पुन्हा त्या नोटा बँकेत जमा केलेल्या नाहीत. यामुळे बाजारपेठेत पुरेशा प्रमाणात चलन खेळते राहत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. नागरिकांनी जास्त जास्त व्यवहार कॅशलेस व्यवहार करावेत. – सुनील दायम, व्यवस्थापक, अग्रणीय बँक.

LEAVE A REPLY

*