नगरची ‘ही’ कन्या होणार बॉलीवूड तारका

अर्शिन मेहताचे 'द रॅली'तून पदार्पण

0

अहमदनगर- मामा तोरडमल, सदाशिव अमरापूरकर, मिलिंद शिंदे या अभिनेत्यांनी बॉलीवूड गाजवले. मधु कांबीकर, राजश्री काळे-नगरकर या तारकांनी रंगमंच गाजवला. मात्र, अर्शिन मेहता या नगरकन्येने थेट बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. उद्या (शुक्रवारी) द रॅली नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. नगरमधील माय सिनेमामध्ये त्याचा प्रिमिअर होणार आहे. या शोसाठी स्वतः अर्शिन उपस्थित राहणार आहे. ही समस्त नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
तिच्यापूर्वी श्रीरामपूरच्या रूपाली विश्‍वासरावने बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र, तिला फारशी छाप पाडता आली नाही. अर्शिन ही आयएमएसआरडीचे संचालक डॉ. मेहेरनोश मेहता यांची कन्या आहे. द रॅली या चित्रपटात ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे.अर्निशचे दहावीपर्यंतचे शिक्षण नगरमध्येच झाले. यानंतर पुण्यातून तिने पुण्यातून सी.ए. केले. जाहिरात क्षेत्रातील यशस्वी मॉडेल म्हणून नावाजलेल्या अर्शिनचे बॉलीवूड पदार्पण नगरचे नाव उंचावणारे ठरणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक दीपक आनंद यांनी हिमालयीन रॅलीवर आधारित दि रॅली या चित्रपटात अर्शिनला मुख्य भूमिका दिली आहे. नगरमध्ये दि.8 सप्टेंबर रोजी पाईपलाईन रोडवरील माय सिनेमा येथे सायंकाळी 7.30 वाजता चित्रपटाचा प्रिमियर होणार आहे. आपल्या गावातील या प्रिमिअर शोला स्वत: अर्शिन उपस्थित राहणार आहे.
नगरमधील एस.जी.कायगांवकर ज्वेलर्सपासून इंम्पिरियल ब्ल्यू, टायटन वॉचेस, एरियल वॉशिंग पावडर, गोदरेज प्युरीफायर, सॅमसंग फोन, मारूती सुझुकी, पारले, अमेरिकाना बिस्कीट, यामाहा, आयपीएलमधील पुण्याच्या क्रिकेट टीम, मॅकडोनाल्डस् अशा अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या जाहिरातीत अर्शिनने काम केले आहे.
बॉलीवूड पदार्पणाबाबत बोलताना अर्शिन म्हणाली की, वडील डॉ.मेहेनोश मेहता व आई शिराज मेहता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्याने सी.ए.झाल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. आई वडिलांनी लहानपणापासून हव्या त्या क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या जाहिराती करतानाच दिग्दर्शक दीपक आनंद यांनी बॉलीवूडमध्ये पहिली संधी दिली आहे. वेगळे व आशयपूर्ण कथानक असलेला हा चित्रपट माझ्या घरच्या प्रेक्षकांना निश्‍चितच आवडेल, असा विश्‍वास अर्शिन हिने व्यक्त केला.

तिचे शिक्षण आर्मी स्कूल, श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या ज्युनियर कॉलेजमध्ये झाले. बारावीत ती शाळेत टॉपर होती. यानंतर तिने बी.कॉम व सी.ए.चा अभ्यासक्रम पुण्यात राहून पूर्ण केला. सी.ए. झाल्यानंतर तिने आपल्या आवडत्या अभिनय क्षेत्राकडे वळण्याचे ठरवून प्रारंभी मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यासाठी तिने पुण्यातील नरी हिरा यांच्या प्रसिध्द स्टार डस्ट अकादमीत अभिनय, मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेतले.
-डॉ. मेहेरनोश मेहता व शिराज मेहता (अर्शिनचे आई-बाबा)

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, कतरिना कैफ, अभिनेता नील मुकेश अशा दिग्गज कलाकारांसमवेत जाहिरात क्षेत्र गाजवताना अर्शिन घराघरात पोहोचली आहे. अर्शिनमधील अभिनय गुण हेरुन प्रसिध्द दिग्दर्शक दीपक आनंद यांनी तिला चित्रपटसृष्टीत पहिली संधी दिली. निर्माता रोहित कुमार यांच्या दि रॅली चित्रपटात नवोदित अभिनेता मिर्झा याच्याबरोबर नायिका म्हणून अर्शिन झळकणार आहे. जगप्रसिध्द हिमालयीन रॅली व त्या अनुशंगाने फुलणारी प्रेम कथा या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

LEAVE A REPLY

*