Type to search

नंदुरबार

नंदुरबार येथे महर्षि वाल्मीक ऋषी जयंती साजरी

Share

नंदुरबार । महर्षी वाल्मीक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, सुरुवातीला नंदुरबार शहरातील रायसिंगपूर भागातून सजवलेल्या एका वाहनावर प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली,

या मिरवणुकीत शहरातील आदिवासी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,वाजत गाजत ही मिरवणूक अमृत चौक, सुभाष चौक, आमदार कार्यालय, दीनदयाल चौक मार्गे पुन्हा रायसिंग पुरा या भागात आली, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी डॉक्टर राजेश कोळी, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस उपनिरीक्षक ताथु निकम, समाजाचे ज्येष्ठ नेते एस,एस, चित्ते,इंदास चित्ते,भास्कर कुवर, अर्जुन मराठे,आदी उपस्थित होते,

या मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित कोळी समाज बांधवांना पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व डॉक्टर राजेश कोळी यांनी मार्गदर्शन केले,विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सेवकांनी देखील या ठिकाणी येऊन महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन केले, शेवटी महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी घारू कोळी,कमलेश कोळी, निलेश कोळी, भैय्या कोळी, तुषार कोळी, योगेश कोळी, आबा कोळी, शिवराज कोळी, सागर चिते, जयेश चिते, भटु वाघ, संदिप कोळी, राजा कोळी, कृष्णा कोळी, हर्षल तवर, चेतन वाघ, मनोज कोळी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!