Type to search

नंदुरबार

नंदुरबार येथे ‘जोडीदाराची विवेकी निवड’ कार्यशाळा उत्साहात

Share

परिवर्धा| ता. शहादा| वार्ताहर  – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नंदुरबारतर्फे जोडीदाराची विवेकी निवड विभागामार्फत एक दिवसीय संवादशाळा संपन्न झाली.

लग्नाळू मुलामुलींसाठी आणि पालकांसाठी नंदुरबार येथील डी.एस.के. हॉल येथे ही कार्यशाळा संपन्न झाली. लग्नाआधी संबंध जोडतांना समाजात पारंपारिक पद्धतीने आर्थिक परिस्थिती, नोकरी, शिक्षण या गोष्टीना प्राधान्यक्रम देऊन संबंध जोडले जातात पण  दोन कुटुंबातील विचार, संस्कार, विवेक या गोष्टीना फारसे महत्व दिले जात नाही व पुढे विवाह नंतर बर्‍याचदा घटस्फोट, विसंवाद आशा घटना वाढत आहे. समाजात घडणारे हे प्रकार कमी व्हावे या साठी महा.अंनिसने या विभागामार्फत युवक-युवती व पालक यांना जोडीदाराची विवेकी निवड असा विभाग सुरू केला आहे. आज संपन्न झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शक आरती नाईक व सचिन थिटे यांनी लग्न जमवण्याआधी युवक युवतीत कोणते विवेक तपासायला हवे, कोणत्या गोष्टीला जास्त महत्व दिले पाहिजे .

हुंडा, मानपणाची भव्यतेपेक्षा दोन कुटुंबातील विचारांची अनुकूलता कशी महत्वाची आहे. हँडसम-ब्युटीफुल दिसण्यापेक्षा स्वभाव गुण सुंदर असणे का महत्वाचे अशा विविध विषयांवर  संवाद, पीपीटी, गटचर्चा करून कार्यशाळा संपन्न झाली.कार्यशाळेसाठी १०० हुन अधिक युवक-युवती आणि पालक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागीनी  लग्न जमवण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबी तपासायला हव्यात हे आज खर्‍या अर्थाने समजले आहे असे मत व्यक्त केले.

सर्व सहभागीना प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात महा.अंनिसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.अर्जुन लालचंदानी, उपाध्यक्ष डॉ.सी.डी.महाजन, शाखाध्यक्ष डॉ.प्रसाद सोनार राज्य सरचिटणीस विनायक सावळे, शांतीलाल शिंदे, खंडू घोडे, फिरोजखान, किर्तीवर्धन तायडे, सूर्यकांत आगळे, वसंत वळवी, चंद्रमणी बरडे, उपक्रम कार्यवाह दिलीप बैसाणे, व्येंकटस शर्मा, धनश्री शिंदे, विश्वजीत शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!