नंदुरबार येथे जिल्हाभरात जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात साजरी

0

नंदुरबार । नंदुरबार येथील दीनदयाल चौफुलीवर सायंकाळी दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, राम रघुवंशी, नगरसेवक कुणाल वसावे, नगरसेवक आनंदा माळी, माजी नगरसेवक विलास रघुवंशी, दिपक कटारीया, रवि पवार, देवेंद्र जैन, सुनिल सोनार, रमेश पाटील, रिना पाडवी, मालती वळवी, अर्जुन मराठे, गजेंद्र शिंपी, प्रविण गुरव आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात म्हणाले की, दरवर्षी शिवसेनेतर्फे हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे दरवर्षी उत्सवाचे नियोजन करतात. अशा उत्सवाप्रसंगी संघटन महत्वाचे असून एकत्रित शक्ती दिसून येते, असे थोरात यांनी सांगितले.

शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहिहंडी उत्सवात एकूण 12 व्यायाशाळांनी सहभाग नोंदविला. यामध्ये वीरशैव लिंगायत व्यायाम शाळा, सावता फुले व्यायाम शाळा, मारूती व्यायामशाळा, संत कबिरदास व्यायामशाळा, मांगरवाडी समाज व्यायामशाळा, सार्वजनिक व्यायामशाळा, जय हनुमान व्यायामशाळा, श्रीकृष्ण व्यायामशाळा व रोकडेश्वर व्यायामशाळा आदी गोविंदा पथकासाठी दहिहंडी फोडण्यासाठी 20 मिनीटांचा कालावधी देण्यात आला होता. विजेत्या गोविंदा पथकांना 31 हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. गोविंदा पथकांचा उत्सह ढोल ताश्यांच्या गजर, गोविंद रे गोपाळाचा जयघोष त्यात रिमझिम बरसात यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह अधिकच वाढला प्रत्येक व्यायामशाळेचे गोविंदा पथक आपापले वेगवेगळे कलाविष्कार सादर करत होते. लेझीनृत्य उत्सवाचे आकर्षण ठरले. यावेळी चोब पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अंबाजी माता मंदिर
म्हसावद । वार्ताहर – अंबाजी माता भक्त म्हसावद ता.शहादा येथे श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बालगोपालांसाठी पर्यावरण पूरक दहिहंडी व मागील वर्षी वृक्षारोपण केलेल्या वृक्षांचे पूजन सत्कार व वृक्षारोपण आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमांची सुरवात सर्पमित्र सुधाकर पाटील अंबाजी माताभक्त मंडळाचे अध्यक्ष सर्व संचालक यांच्या हस्ते मागील उत्सवी लावलेल्या वृक्षाचे पूजन करुण करण्यात आले. यावेळी मंदिरासमोरील मोकळ्या जागेचा बालउद्यान म्हणून विकसीत करण्याचा दृष्टिकोण ठेवून आज औदुम्बर, वढ व पिंपळ आदी वृक्ष लावण्यात आले. नैवद्यार्थी मातांचा ओटी देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमांचे सूत्रसंचलन अशोक बागले व वसंत कुलकर्णी यांनी केले. श्रीकृष्ण व राधा राणीच्या वेशातील बालगोपाल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते या उत्सव यशश्वीतेसाठी भीमसिंग गिरासे, दुष्यंत कुवर, श्याम कुंभार,पिंटू वाघ, योगेश लांडगे, चेतन सांगळे योगेश गोसावी,राम कुंभार,गोरख ठाकरे ,हेमंत वाघ, महेश जगदाळे, अंबाजी माता भक्तमंडकळाचे पदाधिकारी आदिनी परिश्रम घेतले.

बामखेडा इंग्लिश मिडीयम स्कूल
वडाळी ता. शहादा। वार्ताहर – शहादा तालुक्यातील बामखेडा त.त.येथील सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने श्रीकृष्ण जन्माअष्टमी निमित्त गावात रँली काढण्यात आली.तसेच याप्रसंगी सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणात दहि हंडी फोडण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाप्रसंगी इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री कृष्ण,राधा,सुदामाचे पोशाख परिधान करून हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की अशाप्रकारे जयघोष करून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुष्पा पटेल,चेतना पाटिल,तेजस्विनी पाटील,दिपाली पटेल,कोकीळा खैरनार, अनिता शिरसाठ,परेश कासार यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*