Type to search

नंदुरबार

नंदुरबार येथे घरफोडी सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास

Share

नंदुरबार| शहरातील सरस्वतीनगर येथील राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील २ लाख १७ हजार ५१० रूपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सरस्वतीनगर येथे राहणार्‍या विलास तुळशिराम भावसार यांच्या राहत्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी बेडरूमध्ये प्रवेश करत कपाटात ठेवलेले एक सोन्याची चैन असा २ लाख १७ हजार ५१० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विलास भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई शिरसागर करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!