Type to search

नंदुरबार

नंदुरबार तालुक्यातील शिक्षकांना शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार

Share

नंदुरबार | तालुक्यातील स्काऊट गाईडच्या दोन शिक्षक तसेच दोन विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ स्काऊटर पुरस्कार शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.

मुबंई येथे स्काऊट गाईडतर्फे झालेल्या कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा संस्थेतील गाईडर श्रीमती छाया वसंत पाटील यांना सन २०१६-१७ करीता उत्कृष्ठ गाईडर पुरस्कार तसेच स्काऊटर हिरालाल राजाराम पाटील यांना सन २०१७-१८ करीता राज्यस्तरीय उत्कृष्ठ स्काऊटर पुरस्कार शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. तसेच स्काऊट महेश पाटील शिवदर्शन विदयालय,भालेर व गाईड अरुणा पटले एस.ए.मिशन हायस्कुल,नंदुरबार यांना राज्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशासक समितीचे अध्यक्ष शरद उघडे, सहाय्यक आयुक्त,बीएमसी,मुंबई, उपसंचालक श्री.मोटे , महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, प्रशासक समिती सदस्य कार्तिक मुंढे, संतोष मानुरकर आदी उपस्थित होते.प्रशासक कमिटी सदस्य श्री. संतोष मानरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या गुणवत्तापूर्ण उपक्रमांबाबत माहिती सांगितली.

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेचे अध्यक्ष श्री.ज्ञानोबा मुंढे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल अधिक माहिती दिली.सध्या स्काऊट गाईडची संख्या १५ लाखाच्या वर आहे. येत्या दोन वर्षात हीच संख्या १७ ते २० लाखाच्या जवळपास पोहचता येईल असे त्यांनी सांगितलयावेळी मागदर्शन करतांना आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र राज्य.स्काऊट गाईड चळवळ चारित्र्य, हस्तव्यवसाय, आरोग्य व सेवा या चार मूलभूत स्तंभावर आधारित आहे. विद्यार्थ्यावर बालवयात उत्तम चारित्र्यवान, शिस्त तसेच राष्ट्रभक्तीचे संस्कार होतात. चारित्र्य ही स्काऊटींग गाईडींगची अभेद्य बाजू आहे. महाराष्ट्रातील स्काऊट गाईडची नोंदणी भारतात सर्वाधिक आहे. स्काऊट गाईडनी देशसेवा करावी. देशसेवा ही परमोच्च सेवा आहे. देशासाठी जे जे कार्य करता येईल ते स्काऊट गाईडनी करावे असे सांगितले. देशाला स्काऊट गाईड सारख्या युवकांसाठी काम करणार्‍या चळवळीची गरज आहे, असे गौरवोद्गार शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी काढले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे स्काऊट गाईड जिल्हा संस्थेचे सर्व अधिकारी,पदाधिकारी, कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!