Type to search

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात 100 योगशिक्षक करण्याचा मानस

Share

नंदुरबार । योगऋषी रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली परिवारातर्फे नंदुरबार जिल्ह्यात तालुका निहाय शंभर योग शिक्षक प्रशिक्षित करण्याचा मानस युवा सन्यासी स्वामी आनंद देव यांनी व्यक्त केला. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि  सातपुड्याच्या पाडे वस्तीपर्यंत घराघरात योग चळवळ पोहोचविण्याचा  संकल्प  नंदुरबार पतंजली परिवाराने केला आहे .

येथील पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, महिला पतंजली योग समिती, युवा भारत आणि किसान संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पाच दिवसीय योग शिबिर श्रॉफ हायस्कूलच्या मैदानावर झाले. सामूहिक विश्वशांती यज्ञ हवन द्वारे शिबिराचा समारोप करण्यात आला. पाच दिवस सुरू असलेल्या या विनामूल्य योग शिबिरात हरिद्वार येथील योगऋषी स्वामी रामदेव महाराज यांचे शिष्य तथा युवा संन्यासी पूज्य स्वामी आनंददेवजी महाराज यांनी योग संदर्भात मार्गदर्शन केले. सन 2011 मध्ये योग ऋषी रामदेव महाराज नंदुरबारला आले होते.

त्यानंतर नुकतेच त्यांचे शिष्य आनंददेव यांनी योग चिकित्सा शिबिरात विविध आसनांचे प्रात्यक्षिक दाखवून योगमय जीवनाच्या टीप्स दिल्या. याशिवाय स्थूलपणा, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड यापासून मुक्ती साठी वैद्यकीय सल्ला, घरगुती उपचार, आयुर्वेदिक चिकित्सा आदि संदर्भात विनामूल्य माहिती दिली. या शिबिराचा शेकडो महिला पुरुषांनी लाभ घेतला. दरम्यान लवकरच जिल्ह्यातील तालुका निहाय योग शिक्षकांना प्रशिक्षण देऊन घराघरात आणि प्रत्येक समाजात योगाचा प्रचार – प्रसार करण्यात येणार आहे.

25  दिवस चालणार्‍या योग प्रशिक्षण शिबिरात  सहभागी होऊ इच्छिणार्‍या इच्छुक महिला पुरुषांनी सहभागी होण्यासाठी पतंजली चिकित्सालय स्व. शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराशेजारी, नंदुरबार या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन नंदुरबार पतंजली परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!