Type to search

नंदुरबार राजकीय

नंदुरबारात उदेसिंग पाडवींची मोटारसायकल रॅली

Share

नंदुरबार । येथील काँग्रेसचे उमेदवार उदेसिंग पाडवी यांच्या प्रचारार्थ आज नंदुरबार शहरातील प्रमुख मार्गावरुन मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

यावेळी मतदारांशी संपर्कादरम्यान श्री.पाडवी म्हणाले, महाराष्ट्रातील युती सरकार प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आश्वासनांचा जाहीरनामा देते परंतु ते कधीही पाळत नाही. मागील विधानसभा निवडणुकीत या सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी, शुन्य वीज बिल, कमी दरात कर्ज पुरवठा माफ करणे परंतु आश्वासनाची पुर्तता केली नाही. युती सरकारचा काळात संपूर्ण पाच वर्ष गहू, तांदुळ, तेल, साखर, रॉकेल या पाच वस्तुंचा काळात भाव वाढला.त्यामुळे सर्वसामान्यांचा जगणे मुश्किल झाले आहे. भाव वाढीमुळे होत असलेल्या नफाखोर्‍यात युती सरकारचा हिस्सा आहे. आघाडीच्या काळात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर होता.

आज मात्र तो औद्योगिक क्षेत्र, सिंचन क्षेत्र या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात पिछाडीवर पडला. राज्यात रोजगार निर्मितीला खिळ बसली. कायदा व सुव्यवस्थेचा बाबतीत उत्तर महाराष्ट्राची परिस्थिती देशात वाईट आहे. राज्यात प्रशासन आहे की नाही. असा सर्व सामान्य जनतेला पडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा आत्महत्या लोडशेडींग जबाबदार असणार्‍या या सरकारला हद्दपार करा. तुमच्या मतदार संघात गेल्या पंचवीस वर्षात पाहिजे तसा विकास झालेला नाही. विकास झाला आहे तो येथील लोकप्रतिनिधींचा. एकाच घरात किती वर्ष आणि कोणाकोणाला आमदार, खासदार बनवावे, हा विचार जनतेने करण्याची गरज आहे. मला एकदा सेवेची संधी दिल्यास पाच वर्षात नंदुरबार मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!