Type to search

क्रीडा

धोनी लवकरच राजकारणात?

Share

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच राजकारणात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याचा ‘नेतागिरी’ करतानाचा धोनीचा फोटो चांगलाच वायरल झाला आहे. धोनीच्या मित्रानेच हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे धोनी राजकारणात येणार, याची त्याच्या चाहत्यांना चाहूल लागली आहे. धोनीचा बालपणीचा मित्र आणि व्यवस्थापक असलेल्या मिहिर दिवाकरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोमध्ये धोनी नेत्यांच्या लूकमध्ये दिसत आहे. हा फोटा पोस्ट केल्यावर तो वार्‍यासारखा वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी, धोनी राजकारणात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी धोनीची भेट घेतली होती. त्यावेळी धोनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. पण धोनीने मात्र याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!