Type to search

क्रीडा

धोनी नव्या रुपात…

Share

दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार्‍या महेंद्रसिंग धोनीने या काळात सैन्यदलाच्या सेवेत त्याचे योगदान दिले. धोनीने पुन्हा एकदा त्याच्या दैनंदिन आयुष्याकडे मोर्चा वळवला आहे. कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्यासोबतच त्याने आणखी एका महत्त्वाच्या कामालाही वेळ दिला आहे. नुकतेच मुंबईतील मेहबूब स्टुडिओ येथे ‘माहि’ने एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी हजेरी लावली होती.

यावेळी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासुद्धा धोनीसोबत होती. त्याची हेअरस्टायलिस्ट सपना मोती भवनानी हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती धोनीच्या लूकमध्ये काही बदल करताना दिसत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही एक व्ह़िडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात धोनीची नवी हेअरस्टाईल साकारली जात असल्याचे पाहताक्षणी लक्षात येत आहे. माहिचा हा एकंदर अंदाज पाहता येत्या काळात तो नेमका कोणत्या नव्या जाहिरातीतून झळकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचा लूक पाहण्यासाठीही क्रीडारसिकांमध्ये उत्सुकता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!