धोनी कमरेच्या दुखण्याने त्रस्त

0
चेन्नई । चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या कमरेच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळे तो 17 एप्रिलला झालेल्या एका सामन्यालाही मुकला. ज्यात चेन्नईचा 6 विकेटनी दारुण पराभव झाला होता. धोनीला विश्वचषक पाहता काळजी घ्यावी लागणार आहे.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर धोनी बोलताना म्हणाला, की कमरेचे दुखणे पहिल्यापेक्षा कमी आहे. पण विश्वचषक तोंडावर असताना कोणतीही जोखीम मी घेणार नाही. धोनी पुढे बोलताना म्हणाला, की जगातील दिग्गज खेळाडूंना कोणत्या ना कोणत्या फिटनेसची समस्या आहेच. या स्तरावर पोहोचल्यानंतर या समस्या येतच राहणार आहे. मंगळवारी हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईने 6 गडी राखून हैदराबादचा पराभव केला. या विजयसह चेन्नई प्लेऑॅफ पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अर्धशतकच्या जोरावर हैदराबादने 3 बाद 175 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात चेन्नईने वॉटसनच्या तुफानी खेळीच्या जोरावर हे लक्ष्य सहज पार केले. वॉटसनने 53 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 96 धावा केल्या.

LEAVE A REPLY

*