Type to search

धुळे

धुळ्यात रिक्षासह गुरांचे मांस जप्त, चालक ताब्यात

Share

धुळे । शहर पोलिसांनी आज सायंकाळी रिक्षासह गुरांचे मांस जप्त केले आहे. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून दोघांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरिफ उस्मान कुरेशी (वय 36 रा. मिल्लत नगर, धुळे) याने विना परवाना बेकायदेशीररित्या गुरांची खरेदी करून त्यांची कत्तल करून ते मांस झुल्फीकार उस्मान कुरेशी (वय 49 रा. मिल्लत नगर) हा वाहतुक करण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताब्यातील रिक्षात (क्र. एमएच 24 ई 8676) भरतांना उपनिरीक्षक एच.एन. उगले यांच्यासह पथकाने त्याला पकडले. रिक्षासह मांस व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी आरिफ कुरेशी व झुल्फीकार कुरेशी या दोघांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!