Type to search

क्रीडा धुळे

धुळ्यात राज्यस्तरीय निवड चाचणी

Share

धुळे | येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था व महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३६व्या राज्यस्तरीय किशोर- किशोरी खो खो निवड चाचणी स्पर्धेचे दिमाखदार उदघाटन झाले.

स्पर्धेचे उदघाटन प्रांताधिकारी भीमराज दराडे, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, उदय शिसोदे, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त माधवराव पाटील, अखिल भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र  खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव संदिप तावडे, खजिनदार गोविंद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेच्या सुरवातीला ध्वजारोहण व सहभागी संघाचे पथसंचालन झाले. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू पूजा कन्नूरकर, श्रद्धा वसेराव, वैष्णवी जाधव  यांनी मशाल संचलन केले. क्रीडा ज्योत प्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवलेला अजय कश्यप खेळाडूने उपस्थीत खेळाडूना शपथ दिली. या स्पर्धेत एकूण किशोर-किशोरी प्रत्येकी २२ संघ सहभागी झाले आहेत.

याप्रसंगी आमदार कुणाल पाटील, संदिप तावडे, डॉ.चंद्रजीत जाधव यांनी मनोगत व्यक्त करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.  प्रास्ताविक आयोजन समितीचे उपाध्यक्ष डॉ.एस.टी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सदाशीव सूर्यवंशी यांनी केले. तर आभार आनंद पवार यांनी मानले

व्यासपीठावर सत्यजीत शिसोदे, उदय शिसोदे, धर्मेंद्र मोहिते, डॉ.राजेश सोनवणे, तुषार सुर्वे, गोविंद शर्मा, कमलाकर कोळी, राजेश सोनवणे, जयंशू पोळ, गंधाली पलांडे, संजय  गिरासे,नरेंद्र पाटील, गोपी सूर्यवंशी, प्राचार्य डी.पी.राजपूत, नरेंद्र मराठे, चंपक ठाकूर आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या सुरवातीला क्रीडांगण क्रमांक एकवर किशोर गटात नंदुरबार विरूध्द मुंबई उपनगर सामना रंगला. मुंबई उपनगर संघाने एक गुण पाच मिनिटे राखून विजय मिळवला. क्रीडांगण क्रमांक दोन वर किशोरी गटात सोलापूर विरुद्ध परभणी सामना रंगला. त्यात सोलापूरचा संघ एक डाव तेरा गुणांनी विजयी ठरला. क्रीडांगण क्रमांक तीनवर किशोरी गटात नाशिकविरुद्ध हिंगोली यात सामना रंगला. नाशिक संघाने एक डाव राखत व सोळा गुण मिळवत विजय मिळवला व यांच्यात सामना रंगला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!