Type to search

धुळे

धुळ्यातील विठ्ठल मंदिरात आज महापूजा

Share

कापडणे । आषाढी एकादशीनिमित्त शहरातील देवपूर परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा व कीर्तन होणार आहे.

जीटीपी कॉलनी परिसरातील या मंदिरात आज (ता.12) सकाळी साडेसहा वाजता अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या हस्ते सपत्निक महापूजा होईल. मंदिरात सकाळी नऊपासून महाप्रसाद वाटप होईल, तर रात्री आठ वाजता किशोर महाराज (मोरदडकर) यांचे कीर्तन होईल.

जीटीपी कॉलनी परिसरातील रहिवाशांनी लोकसहभागातून भव्य आणि आकर्षक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारले आहे. दरवर्षी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम होतात. यंदा महापूजा, महाप्रसाद वाटपाबरोबर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी दर्शनासह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीटीपी कॉलनी वासीयांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!