Type to search

धुळे

धुळ्याच्या डॉ.आशिष पाटलांचा मलेशियात गौरव

Share

धुळे | नुकत्याच मलेशिया येथे झालेल्या जागतिक परिषदेत येथील युरोलॉजिस्ट डॉ. आशिष पाटील यांनी संशोधित केलेल्या पीसीएनएल सिम्युलेटरला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

युरोलॉजी असोसिएशन ऑफ एशियाची १७ वी परिषद मलेशियाची राजधानी क्वालालमपूर येथे संपन्न झाली. त्यात आशिया खंडाच्या विविध देशांतील दोन हजारहून अधिक युरोजॉजिस्ट सहभागी झाले होते. परिषदेत रोबोटिक, दुर्बिनीद्वारे सर्जरी, कॅन्सर, पुरुष वंध्यत्व, बाल मूत्रविकार चिकित्सा आदींबाबत विचारमंधनासह नवनवीन संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले. रुग्णाच्या पाठीमागे छिद्र करून दुर्बिनद्वारे मूतखडा काढण्याच्या प्रक्रियेला पीसीएनल सर्जरी म्हणतात. परिषदेत तेजनक्षचे डॉ. लोकेश पाटणी यांनी पीसीएनएल सिम्युलेटर सादर केले. युरोलॉजी असोसिएशन सिम्युलेटर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांना मान्यता आणि प्रोत्साहन देत आहे. अधिकाधिक नवोदीत युरोलॉजिस्ट यांना प्रशिक्षण दिले जाऊ शकेल. यासाठी सिम्युलेटर हा एक स्वस्त पर्याय आहे. नवोदित युरोलॉजिस्टला पीसीएनएलचा सराव करता यावा, थेट रुग्णावर प्रयोग न करता आधी त्यांनी सिम्युलेटरवर सराव करून प्रशिक्षित झाल्यावर रुग्ण हाताळावा यासाठी या सिम्युलेटरची निर्मिती करण्यात आली आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. त्यांनी संशोधित केलेले सिम्युलेटर कमी खर्चिक असून त्याची हाताळणी खर्‍या शस्त्रक्रियेची अनुभुती देते. विशेष म्हणजे या सिम्युलेटरचा पुनर्वापर करता येतो.

संशोधन केल्याचे समाधान
अचूक शस्त्रक्रिया हा संशोधनाचा मूळ उद्देश असून नवीन युरोलॉजिस्टला प्रत्यक्ष रुग्ण हाताळण्याआधी सराव करता यावा, यासाठी हे संशोधन आहे. विदेशातही पतका फडकविल्याचे समाधान आहे.
– डॉ. आशिष पाटील,

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!