Type to search

धुळे

धुळे, सोनगीर, शिरपूरमध्ये रथोत्सवाची धूम

Share

धुळे । गोविंदाचा जयघोष… भक्तीमय वातावरण… भाविकांची गर्दी… धुळे, सोनगीर आणि शिरपूरात बालाजींच्या रथोत्सवामुळे दिसून आली.
जिल्ह्यात विजयादशमीनंतर येणार्‍या एकादशीला धुळे, सोनगीर, शिरपूर या तीन ठिकाणी रथोत्सव मिरवणूक काढण्यात येते. तत्पुर्वी नवरात्रोत्सवात दहा दिवस वेगवेगळी वहन मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. ती आजतागायत सुरू आहे. मिरवणूकीच्या आदल्या दिवशी रथ बाहेर काढण्यात येवून आकर्षक सजविला जातो.

धुळे शहरात रथोत्सवाच्या मार्गावर भाविकांसाठी अनेकांनी अन्नदान केले. विविध मंडळांतर्फे उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले. त्याचबरोबर साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचे इतर पदार्थ भाविकांना देण्यात आले. त्याचबरोबर काही मंडळातर्फे पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. बालाजींच्या रथ निघण्यापुर्वी चारही ठिकाणी त्याची विविध मान्यवरांच्या हस्ते पुजा करण्यात आली. त्यानंतर विविध भजनी मंडळे आणि सांस्कृतिक मंडळाच्या पथकांच्या सान्निध्यात रथाची मिरवणूक काढण्यात आली. सोनगीर, बेटावद येथील रथ ग्रामीण भागातील रथ समजले जातात.

धुळे व सोनगीर येथे रात्रीच्या सुमारास रथावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. रथ पुढे जातो तशी ही रोषणाईही आणखीनच उजळून दिसते. रथोत्सवानिमित्त धुळे, सोनगीर व शिरपूर येथे चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!