Type to search

धुळे

धुळे, शिंदखेडा, पिंपळनेरला पाऊस

Share

धुळे | तेरा दिवसांच्या विश्रांतीनंतर धुळे, शिंदखेडा व पिंपळनेर येथे आज पावसाने हजेरी लावली.

ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाने कहर केला होता. यामुळे साक्री तालुक्यातील सर्व जलाशय ओसांडून वाहत असून पांझरा नदीला महापूर आला होता. जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु विश्रांतीनंतर पावसाने आज दि. २१ ऑगस्ट रोजी धुळे, शिंदखेडा व पिंपळनेर येथे हजेरी लावली.

धुळे शहरात दुपारी पावसाने हजेरी लावली. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. तर व्यापार्‍यांची तारांबळ उडाली. तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसराला सायंकाळी ७ वाजेनंतर अर्धातास पावसाने झोडपून काढले. तर शिंदखेडा व परिसराला दुपारी ३.१५ ते ४ वाजेदरम्यान जोरदार पावसाने झोडपले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!