Type to search

धुळे नंदुरबार

धुळे/नंदुरबार जि. प.प.स. बरखास्त प्रशासकांची नियुक्ती

Share

धुळे /नंदुरबार । धुळे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या चार पंचायत समित्यांंचा कार्यकाळ संपुष्टात आला असून जि.प.वर प्रशासक म्हणून जि.प.च्या सीईओंची तर पंचायत समितीवर गटविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धुळे व नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला असून निवडणूक जाहीर होईपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत आज शासनाने अध्यादेश काढला आहे. नागपूर, वाशीम, अकोला, धुळे व नंदुरबार या जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समितींचा कार्यकाळ संपुष्टात आणण्यात आला असून जिल्हा परिषद प्रशासकपदी मुख्य कार्याकारी अधिकारी तर पंचायत समितीच्या प्रशासकपदी गटविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचा अध्यादेश शासनाचे कार्यासन अधिकारी विजय लिटे यांनी आज काढला आहे.

दरम्यान धुळे व नंदुरबार जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत पंचायत समितीची मुदत डिसेंबर 2018 संपली आहे. परंतु काहींनी गटनिहाय आरक्षणाविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या त्यामुळे निवडणूकीला स्थगिती मिळाली. म्हणून डिसेंबर महिन्यात विद्यमान पदाधिकार्‍यांनाच मुदत वाढ देण्यात आली होती.

आज दि. 18 जुलै रोजी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या पाचही जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणार्‍या सर्व पंचायत समित्यांवर संबंधीत जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधीत पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर प्रशासक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहणार आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे राहणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!