धुळे जिल्ह्यातील तिघे हद्दपार

0
धुळे । दि.14 । प्रतिनिधी- वेगवेगळ्या गुन्ह्या संदर्भात तिघांवर तडीपारची कारवाई करण्यात आली. प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी या संदर्भातील आदेश काढले. या तिघांना तडीपार करण्यात आले आहे.
निहाल पारस परदेशी रा. नेहरु चौक साईबाबा मंदिराजवळ धुळे याच्याविरुध्द अधिनियम 1951 कलम 56 (1) (अ) अन्वये हद्दीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

परदेशी याच्याकडून होत असलेले गुन्हे लक्षात घेवून ही कारवाई करण्यात आली आहे. घरफोडी संदर्भात त्याच्याविरुध्द गुन्हे दाखल असून प्रतिबंधात्मक उपाय योजना करुन त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती.

त्यामुळे त्यांना धुळे, जळगाव, नासिक, अहमदनगर या जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

फुलपगारे तडीपार
विजय आसाराम फुलपगारे ग.नं.14 जुने धुळे याच्याविरुध्द विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये घरफोडी, चोरी या सारख्या गुन्ह्यांची संख्या अधिक असून फुलपगारे याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करुनही सुधारणा झाली नाही. त्यामुळे फुलपगारे यास धुळे, जळगाव, नासिक, अहमदनगर या चारही जिल्ह्यातून तीन महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी याबाबतचा आदेश काढला.

चत्रे तडीपार
मेहुल दत्तात्रय चत्रे रा. एसटी कॉलनी पालेशा कॉलेज धुळे यांच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याने हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना जळगाव, धुळे, नंदुरबार, नासिक या चार जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनीही कारवाई केली.

LEAVE A REPLY

*