धामणवनच्या महिलांनी स्थापन केली गावरान बियाणे बँक

0
अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांगण भागातील धामणवन हे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले छोटेसे आदिवासी खेडे. या गावातील कावेरी महिला स्वयंसहायता बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन नुकतीच गावरान बियाणे बँकेची स्थापना केली. यासाठी लोकपंचायत या सामाजिक संस्थेनी गटातील महिलांना मदत व मार्गदर्शन केले.
संकरीत बियाणे, रासायनिक खते व औषधे यांचा वाढता वापर, जंगलावरील क्षेत्र घटल्याने मधमाशांची संख्या घटल्याने पराग सिंचनावर झालेला विपरीत परिणाम यामुळे कृषी जैवविविधता धोक्यात आलेली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे (ॠश्रेलरश्र थरीाळपस एषषशलींी) संकरीत बियाण्यांपासूनच्या पिकांच्या उत्पादनाची शाश्वतता धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत आदिवासी महिलांनी गावरान बियाणे संवर्धन व वाढ यासाठी घेतलेला हा वसा बहुमोल असा म्हणावा लागेल. या बीजबँकेच्या उभारणीसाठी गटातील महिलांनी आजूबाजूच्या परिसरातील गावांमधूनभात, गहू, वाल, भुईमुग, नाचणी इ.पिकांचे गावरान जातींचे विविध एकूण120 प्रकारचे बियाणे संकलित केले आहे.
या बीज बँकेचे नुकतेच संगमनेरचे तंत्र अधिकारी पांडुरंग साळवे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून शाहीर प्रा. तुळशीराम जाधव, लोकपंचायतचे कार्यकारी विश्वस्त सारंग पांडे, आदिवासी हक्क प्रकल्प प्रमुख हनुमंत उबाळे, कृषी सहाय्यक, ए. एम. धुमाळ, संस्थेचे कार्यकर्ते विजय सांबरे आदी उपस्थित होते. तसेच गावातील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.जाधव म्हणाले की, गावरान बियाणे वाचले तरच आपले बेणं वाचणार आहे. बियाणे बँक हि खरोखर सोन्याची बँक आहे. तर सारंग पांडे यांनी शेतकर्‍यांना जास्त पिकवण्यापेक्षा चांगल्या गुणवत्तेच पिकवण्याचे महत्व पटवून दिले. तसेच संस्थेचे कार्यकर्ते सांबरे यांनी सांगितले की, कठान म्हणजे पूर्वीपासून कमी महत्वाचे पिक म्हणून ओळखले जाते.पण हेच फार महत्वाचे आहे.कारण जर आरोग्यसंपन्न जीवन जगायचे असेल तर कठान हे महत्वाचे आहे .

या बिज बँकेमुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील दुर्मिळ व नामशेष होत असलेल्या भात, नाचणी, वरई, सावा,गह ूव वाल यांसारख्या पिकांच्या जातीचे संवर्धन व त्याखालील लागवड क्षेत्रात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. याकरिता महिलांनी बियाणे बँकेच्या माध्यमातून कमी दराने बियाणे विक्री किंवा घेतलेले बियाणे वाढीव पद्धतीने परत देण्याच्या अटीवर त्या हंगामात शेतकर्‍यांना वितरीत करण्याचे देखिल नियोजन केले आहे.

LEAVE A REPLY

*