धरणांमधील गाळ 15 जुनपर्यंत वाहुन नेण्यास परवानगी – जिल्हाधिकारी

0

जळगाव / राज्यातील धरणे व जलसाठ्यांच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी व शेतकर्‍यांच्या शेतीचा विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना अंमलात आणली आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना स्वखर्चाने आपल्या परिसरातील कोरडे झालेले तलाव, साठवण बंधारे, धरण आदीमधील गाळ 15 जुनपर्यंत वाहून नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या अभियानाचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी धरणातील सुपिक गाळ आपल्या शेतीत टाकून आपल्या शेतीचा विकास करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी आज संवाद साधला.

त्यानंतर लगेचच जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली.

 

LEAVE A REPLY

*