Type to search

जळगाव

धरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त

Share

जळगाव । धरणगाव -पिंप्री रस्त्यावरुन गुटख्याची खाजगी वाहनातून वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पावणे चार लाखांचा गुटखा जप्त केला आहे.चालक रविंद्रसिंग राजपूत याला पोलिसांनी अटक केली आहे.

धरणगाव येथून पिंप्रीकडे एमएच 18 डब्ल्यु 4325 या वाहनातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, रविंद्र घुगे, विनायक पाटील, प्रमोद लाडवंजारी, इद्रीस पठाण यांनी पिंप्री रोडवरील साई हॉटेलसमोरील रस्त्यावर हे वाहन अडविले. त्यानंतर या वाहनाची तपासणी करण्यात आली असता, गाडीच्या मागील सिटवर गोण्यामध्ये पावणे चार लाखांचा गुटखा मिळून आला. चालक रविंद्रसिंग राजपूत (वय 24 रा. राजपूत मंगल जळगाव) याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुध्द भादवी कलम 188, 272, 273, 328, सह फुड सेफ्टी अ‍ॅन्ड स्टॅन्डर्ड अ‍ॅक्ट 2006 प्रमाणे कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!