धरणगाव पालिकेकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनी उड्डाण पुलाचे नामकरण

0

धरणगाव | प्रतिनिधी :  स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून नगरपालिकेने येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डानपुलाला ‘सावित्रीबाई फुले उड्डाणपुल’ असा नामकरण सोहळा व शहरातील विद्यार्थ्यांसाठी पालिकेने न.पा.ग्रंथालयात आणलेल्या स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा समावेश सोहळा पालिका प्रांगणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे होते. समाजसुधारकांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकातून चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास विसावे यांनी कार्यक्रमाची भुमिका विशद केली.

उड्डाण पूलाचे नामकरण माळी समाजाचे अध्यक्ष प्रा.बी.आर.माळी व रामकृष्ण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकाचे समावेशन दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा.गोपाल दर्जी यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प.रा.सोसायटीचे सचिव डॉ.मिलिंद डहाळे, प्राचार्य डॉ.टी.एस.बिराजदार, युवासेना जिल्हाप्रमुख प्रितेश ठाकूर, नगराध्यक्ष सलिम पटेल, उपनगराध्यक्षा सौ.सुरेखा विजय महाजन, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे, भाजपाचे गटनेते कैलास माळीसर, मुख्याधिकारी सपना विसावे हे होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नगरपालिकेने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून पुरोगामी विचाराने सावित्रीबाई फुले यांचे नाव उड्डाण पुलाला दिल्याने शहराच्या लौकिकात भर पडली असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बांधकाम सभापती सुरेश महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, उज्ज्वला साळुंखे, अंजली विसावे, कल्पना महाजन, भागवत चौधरी, शरद कंखरे, शोभा राजपूत, भालचंद्र जाधव, संगिता मराठे, ललित येवले, आराधना पाटील, नंदा धनगर, अहमद पठाण, अजय चव्हाण, जानकिराम पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, डॉ.रवींद्र सोनवणे, तुळशीराम महाजन, विजय महाजन, संजय चौधरी, धिरेंद्र पुरभे, ऍड.शरद माळी, जयेश महाजन गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भानुदास विसावे यांनी केले.

पालिकेत सावित्रीबाईंची प्रतिमा भेट

viju

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून उपनगराध्यक्षा सौ.सुरेखा विजय महाजन यांनी येथील पालिका सभागृहात लावण्यासाठी भव्य प्रतिमा भेट दिली.

नगराध्यक्ष सलिम पटेल,  शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्राचार्य डॉ.बिराजदार, प्रा.गोपाल दर्जी, कैलास माळीसर, माळी समाजाचे अध्यक्ष प्रा.बी.आर.महाजन, रामकृष्ण महाजन व डॉ.मिलिंद डहाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे अनावरण उपनगराध्यक्षा सौ.सुरेखा महाजन, विजय महाजन  यांनी केले. याप्रसंगी समाजबांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

पालिके सभागृहात सावित्रीबाईंची प्रतिमा सामाजीक कार्य करण्यासाठी प्रेरणा देत राहिल असे सौ.सुरेखा महाजन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*