Type to search

क्रीडा जळगाव

धरणगावात मंगळवारी ‘खान्देश केसरी’ कुस्ती स्पर्धा

Share

धरणगाव | येथे मरीआई यात्रोत्सवानिमित्ताने मंगळवारी, दि.२७ ऑगस्ट रोजी ‘खान्देश केसरी’ कुस्ती स्पर्धा होणार असून, राष्ट्रीय स्तरावरील मल्लांची जोड निश्चित करण्यात आली आहे. त्यात गतवर्षी ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावलेला मल्ल बाला रफिक(सोलापूर) विरुद्ध ‘भारत केसरी’ तेजवीर पुनिया (हरियाणा) यांच्यात रोमहर्षक लढत होणार आहे. या कुस्तीची महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.

यासाठी राज्यासह परप्रांतीय मल्लांची धरणगावी उपस्थिती लाभणार आहे. यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे यांनी सांगितले की, धरणगावच्या श्री व्यायाम प्रसारक मंडळाने खान्देशच्या मातीत राष्ट्रीय पातळीवरच्या मल्लांना खेळवून त्यांचा सन्मान केला आहे. बाला रफिक विरुद्ध पुनिया यांच्या लढतीसाठी २ लाख ५१ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच विजयी मल्लाला ‘खान्देश केसरी’ पुरस्कार व गदा प्रदान करण्यात येणार आहे. या कुस्तीचा शुभारंभ सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या खुल्या कुस्त्यांचा लाभ मल्लांनी व कुस्तीप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!