Type to search

धुळे

धनूरच्या शेतकर्‍याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्त्येचा प्रयत्न

Share

धुळे | शिंदखेडा तालुक्यातील सोनवद धरणात शेतजमीन गेलेल्या शेतकर्‍याने गेल्या ३० वषार्ंपासून न्यायासाठी संघर्ष केला. परंतु निराशा हाती पडल्यामुळे आज त्या शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येवून विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच त्या शेतकर्‍याला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शेतकर्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्या शेतकर्‍याशी चर्चा केली.

धनूर ता. धुळे येथे राहणार्‍या शेतकरी आत्माराम गजमल चौधरी यांच्या मालकीचे लोणकुटे शिवारात शेतजमीन गट नं.३३ आहे. परंतु १९८५ मध्ये शासनाने सोनवद प्रकल्पासाठी जमीन संपादीत केली. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ ३३ आर एवढी शेतजमीन राहिली. या शेतजमीनीत त्यांनी दोन लाख रुपये खर्च करुन सिताफळाची १६० झाडे लावली. परंतु शेतात धरणातील बॅक वॉटर घुसल्याने पिकांचे नुकसान झाले. याबाबत शासन व प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु आत्माराम चौधरी यांना मोबदला मिळाला नाही. तसेच त्यांचे पुनर्वसनही करण्यात आले नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या चौधरींना नैराश्य आले व त्यांनी आज त्यांच्या खिशात विषाची बाटली आणली. ते सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले. तेथे त्यांनी विष घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांनी अडविले व त्यांच्याकडे विषची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदर शेतकर्‍याला चर्चेसाठी जिल्हा प्रशासनाकडे नेले. केवळ प्रशासनाशी चर्चा झाली. अद्याप तोडगा निघालेले नाही.

त्या शेतकर्‍याला रडू कोसळले
विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍याला पोलिसांनी रोखले. त्यानंतर आपबिती मांडतांना त्या शेतकर्‍याला रडू कोसळले. आता लढण्याची क्षमता नसल्याने शासनाने त्वरीत मोबदला द्यावा तसेच अपंग मुलाला नोकरीत सामावून घ्यावे. अशी मागणीही त्या शेतकर्‍याने केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!