धनुष करणार सासऱ्यांसाठी दिग्दर्शन!

0

रजनीकांत यांच्यासोबत एकदा तरी काम करायला मिळावे अशी प्रत्येक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्याची इच्छा असते.

रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष यालाही आपल्या सासऱ्यांसाठी दिग्दर्शन  करण्याची इच्छा आहे.

धनुषने यावर्षी ‘पा पांडी’ या चित्रपटाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

ज्येष्ठ अभिनेते राजकिरण यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या या चित्रपटाला समीक्षक, चाहते आणि सेलिब्रिटींकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

तामिळनाडूमध्ये धनुषच्या चित्रपटाने बऱ्यापैकी कमाई केली आहे. याच यशामुळे धनुषने आता या चित्रपटाचा सिक्वल काढण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे, यामध्ये आपल्या सासरेबुवांना म्हणजेच रजनीकांत यांना त्याने मुख्य भूमिकेसाठी विचारल्याचीही चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनुषच्या कामाने प्रभावित झालेल्या या ‘थलैवा’ अभिनेत्याने याआधीच चित्रपटासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

LEAVE A REPLY

*