धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने माजी मंत्री पिचड यांचा निषेध

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- माजी मंत्री मधुकर पिचड यांनी धनगर समाज आरक्षणाचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या टाटा इन्स्टीट्युट सोशल सायन्स या संस्थेच्या पदाधिकार्‍यांना अडचण निर्माण करून त्यांच्या कार्यात अडथळा आणला त्यामुळे धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला असून धनगर समाजाला डीवचण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री विठ्ठलराव राऊत यांनी दिला आहे.

 

 

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अकोले तालुक्यात मुथाळणेच्या नायकरवाडी, पागरीवाडी, घाटघर परिसरात धनगर समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी टाटा इन्स्टीट्युट सोशल सायन्स या संस्थेचे पदाधिकारी गेले असता माजी मंत्री पिचड यांनी या अधिकार्‍यांना विनाकारण अडथळा निर्माण केला. सध्या ही संस्था राज्यभर सर्व्हे करत आहे.

 

 

ही संस्था समाजाच्या चालीरिती, रूढी, परंपरा, वेषभुषा, व्यवसाय, पारंपारीक आर्थिक दृष्टया, शैक्षणिक दृष्टया या सर्व बाबींची तपासणी करत असून अकोले तालुक्यात त्यांचे काम सुरू असताना मधुकर पिचड यांनी संबंधीत अधिकार्‍यांची खरडपट्टी केली. त्यामुळे त्यांच्या या कृत्याचा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला असून धनगर समाजाला डीवचण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

 

 

या निवेदनावर उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री विठ्ठलराव राऊत, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमनर, जिल्हा कार्याध्यक्ष शरद देवकर, सचिन काळे, बाळासाहेब गोराणे, सचिन राशिनकर, योगेश राऊत आदींच्या सह्या आहेत.

 

 

 

LEAVE A REPLY

*