Type to search

जळगाव

धनगर समाजाला हक्काचे आरक्षण हवे, पांगळे नको!

Share

जळगाव । धनगर समाजाला हक्काचं आरक्षण हवं, पांगळ आरक्षण नको, तसेच दिलेल्या आश्वासनानुसार अनु. जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाचे लाभ द्या; अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत किंमत मोजावी लागणार, असा इशारा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचतर्फे समन्वयक जिल्हाप्रमुख चंद्रशेखर सोनवणे यांनी येथील केमिस्ट भवनात पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी मंचचे उपाध्यक्ष प्रल्हाद पवार, शामकांत वर्डीकर, चिटणीस पेंढारकर, धोंडू वाघ, सदस्य सोनू भगत, राहुल पवार आदी उपस्थित होते.

मराठा समाजाला नुकतेच 16 टक्के आरक्षण मंजूर झाले, या निर्णयाचे स्वागत आहे. धनगड व धनगर हा वाद पुढे रेटून धनगर समाजाला आरक्षण देण्यास मुद्दाम विलंब केला जात आहे, उच्च न्यायालयानेही धनगड व धनगर हे एकच आहेत. सर्वस्वी धनगर हेच प्रचलित नाव आहे. धनगड वगैरे काही नाही, असे स्पष्टीकरण केलेले असतांना आरक्षणास विलंब का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मूळ मागणी अनु. जमातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची असतांना महायुती सरकारने आगामी अर्थसंकल्पात एक हजार कोटीची तरतूद करुन आरक्षणाच्या बदल्यात पैसे देवू केले आहे. गत निवडणुकीत आरक्षणाबाबत दिलेले आश्वासन पूर्ण केलेच नाही,

धनगर समाजाला असं पांगळं आरक्षण नको, असेही प्रबोधन मंचतर्फे सोनवणे यांनी स्पष्ट केलेे. तरी आरक्षण लागू न केल्यास त्याची किंमत निवडणुकीत मोजावी लागेल, असा इशाराही मंचने पत्रकाद्वारे दिला असून आरक्षणाबाबत भूमिका ठरविण्यासाठी 21 जुलै रोजी पुणे येथे राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात येईल, असेही मंचतर्फे सोनवणे यांनी माहिती दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!