द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी आ.चौधरींच्या भगिनी रेखा चौधरींचा आंतरराष्ट्रीय गौरव

0

अमळनेर | प्रतिनिधी :   द पिलर ऑङ्ग हिंदुस्थानी सोसायटी या पुरस्काराने यंदाच्या वर्षी रेखा चौधरी यांना गौरविण्यात आले. यंदाच्या वर्षातील एक मानाचा तुरा त्यांच्या यशाच्या कंगोर्‍यात रोवला गेला. हा पुरस्कार एशियन चेम्बर ऑङ्ग कॉमर्स  इंडस्ट्रीच्या सहाय्याने प्रदान करण्यात येतो आणि याचा मान रेखा चौधरींना मिळाला ही आपल्या मराठमोळ्या संस्कृतीसाठी अभिमानाची गोष्ट असून सौ.रेखा या आ.शिरिष चौधरी यांच्या भगिनी होत.

REKHA CHAUDHARI

या पुरस्काराचे महत्त्व हे एका गोष्टींमुळे व्दिगुणीत झाले ते म्हणजे भारतातील ग्रामीण भागातून आलेल्या स्त्रीचा कर्तुत्वान कामगिरीची दखल घेऊन त्यांचा या व्यासपीठावर सन्मान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात अनेक आंतरराष्ट्रीय देश जसे रशिया, यू.के, स्पेन आणि आङ्ग्रिका त्याचप्रमाणे अनेक देशातील जनरल  काऊन्सिल यांचा सहभाग होता. याचबरोबर सरकारी क्षेत्रातील अधिकारी, मंत्री आणि आंतरराष्ट्रीय विविध व्यावसाहिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वाचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

*