दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0

श्रावणीच्या आईचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर (प्रतिनिधी) – डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महापालिकेच्या देशपांडे रुग्णालयात रुग्ण महिलेचा प्रसुती दरम्यान मृत्यूला दोषी असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मृत श्रावणीची आई योगीता सोन्नीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
11 जून रोजी महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात श्रावणी रविंद्र निकम या विवाहितेचा बाळासह प्रसुती दरम्यान मृत्यू झाला होता. प्रसुतीवेळी शस्त्रक्रिया करण्याची गरज असताना व त्यासाठी नातेवाईकांची संमती असतानाही संबंधित डॉ. अतूल ठोकळ यांनी शस्त्रक्रिया केली नाही, असा सोन्नीस यांचा आरोप आहे. प्रसुतीदरम्यान विवाहितेची प्रकृती खालावली असतांनाही डॉ.ठोकळ रुग्णालयात उपस्थित नव्हते त्यानंतर त्यांनी संबंधित महिलेला खाजगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, खाजगी रुग्णालयात दाखल केले असताना, त्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळे श्रावणीचा देशपांडे रुग्णालयातच मृत्यू झाल. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी सोन्नीस यांची मागणी आहे.

श्रावणी निकम ही योगिता सोन्नीस यांची एकुलती एक मुलगी होती. मोलमजूरी करुन सोन्नीस यांनी तिला लहानचे मोठे केले. श्रावणीच्या मृत्यूने योगिता सोन्नीस या एकाकी पडल्या आहेत. त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी सोन्नीस यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांना शिष्टमंडळाने भेटून याप्रश्री लक्ष घालण्याची मागणी केली आहे. मृत श्रावणीची तीन दिवसांची असतानाच 1997 मध्ये तिचे पितृछत्र हरपले होते.

LEAVE A REPLY

*