दोन सख्या भावांचा बुडून मृत्यु

0

चाळीसगाव / चाळीसगाव तालुक्यापासून जवळच असलेल्या नागद येथील वडगाव शिवारातील धरणाच्या पाण्यात बुडून दोन सख्ये भाऊ व साडु असलेल्या भावांचा मृत्यु झाला आहे.

हि घटना दि.6 रोजी संकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली आहे.

योगेश नाना ठाकरे(32), निलेश नाना ठाकरे(28) दोघे रा.नागद हे शनिवारी वडगांव शिवारातील मध्यम प्रकल्पाच्या धरणाच्या खड्डयात असलेली पाण्याची इलेक्ट्रीक मोटर सरकावण्यासाठी गेले होते.

मोटार सरकवत असताना, एका भावाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. दुसर्‍या भावाने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली असता.

दोघांचाही पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यु झाला. योगेश व निलेश हे एकत्र राहत होते.

त्यापैकी निलेशचे तीन महिन्यापूर्वी भावाच्या सालीशी लग्न झाले होते. दोघे भावांचा एकाच वेळी मृत्यु झाल्याने नागद गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

*