दोन मुलांसह आईची आत्महत्या; विहिरीत आढळले मृतदेह

0

अहमदनगर /दोन मुलांसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

ही घटना शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

मंदा बडे असे त्या आत्महत्या केलेल्या आईचे नाव असून दीपक आणि कृष्णा असे त्या मृत चिमुकल्यांची नावे आहेत.

मंदा या पिंगेवाडी येथे राहतात. त्यांना दीपक ( वय 8 वर्ष ) आणि कृष्णा ( वय 13 महिने ) ही दोन मुले आहेत.

मात्र त्यांचे हे दोन्ही चिमुकले गतीमंद असल्याने त्यांच्या उपचाराला वैतागून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

*