दोन दिवसात 4 हजार उमेदवारांची हजेरी ; महापालिका रोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद

0

नाशिक : दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, नाशिक महानगरपालिका, नाशिक आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग नाशिक यांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यास दोन दिवसात 4 हजार लाभार्थी उमेदवारांनी हजेरी लावली.

शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर व महात्मा फुले कलादालनात आयोजित मेळाव्यास उद्घाटनापासून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. रोजगार मेळाव्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजक, 22 कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रशिक्षण देणार्‍या 22 संस्थांचे प्रतिनिधी तसेच सुमारे 1500 लाभार्थी उमेदवार उपस्थित होते.

उद्घाटन समारंभानंतर प्रत्यक्ष नोंदणी आणि मुलाखतीस माहात्मा फुले कलादालन येथे सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी उद्योजक प्रतिनिधींना उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी 40 स्वतंत्र कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती.

या रोजगार मेळाव्यास पहिल्यास दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिवसभरात सुमारे 1500 तर दुसर्‍या दिवशी 2601 लाभार्थी उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास भेट दिली. अशा एकूण 4 हजार लाभार्थी उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घेतल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*