दोघे दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- दरोड्याच्या गुन्ह्यातील पसार दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. शनिवार पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पांडुरंग नामदेव खंडागळे (रा. पांढरीपुल, ता. नेवासा) व ज्ञानदेव दिलीप आदले (रा. औरंगापुर. ता. पाथर्डी) अशी अटक केलेल्या दोघा दरोडेखोरांची नावे आहेत. या दोघांविरुध्द शेवगाव व राहुरीत गुन्हे दाखल आहेत. एलसीबीच्या पोलीस पथकाने नानासाहेब उत्तम शेळके या वॉन्टेड आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो मयत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. या घटनेप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मधुकर शिंदे, काळे, काकडे, शेजवळ, संदीप घोडके, सुनील चव्हाण, भोपळे, मनोज गोसावी, रवी कर्डीले, किरण जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

*