दोघा नाशिकरांची क्रिकेट व फुटबॉल राज्य-सचिव पदी वर्णी

0

नाशिक : भारतीय स्कूल स्पोर्ट्स ऍण्ड कल्चरल एक्टिव्हीटीज महासंघ व महाराष्ट्र स्कूल स्पोर्ट्स एन्ड कल्चरल एक्टिव्हीटीज असोसिएशनच्या वतीने नाशिकचे  प्रतिक पाटीलची क्रिकेट तर सनी रॉयची फुटबॉल खेळासाठी महाराष्ट्र राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

प्रतिक व सनी यांची निवड त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी व खेळातील अनुभव बघून केली गेली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

स्काफ इंडिया हा महासंघ विविध खेळांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असतो.

स्काफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश क्रीडा संचालक नीलेश राणे यांच्या हस्ते नविन राज्य-सचिव प्रतिक पाटील व सनी रॉय यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी दिनेश खैरनार (नाशिक उपसचिव) व विकास वराडे (नाशिक सदस्य) यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*