दोघांचा पुरात वाहून मृत्यू

0
चहार्डी/चाळीसगाव / चोपडा तालुक्यात दि.7 रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नद्या, नाल्यांना पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला तर चहार्डी येथे चंपावतीला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.
या घटनेने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. तसेच विजांचा जोरात कडकडाट होऊन झाडण चौकातील एका झाडावर वीज कोसळली.
यात कोणतीही हानी झाली नाही. तर दुसर्‍या घटनेत ओझर (ता. चाळीसगाव) येथील तितुर नदी पार करत असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने 9 वर्षीय राहुल जिभाऊ बागुल हा शाळकरी मुलगा वाहुन नागडोहात बुडाला.

हि घटना दि.8 रोजी दुपारी 2 वाजता घडली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह मिळुन आल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. पहिल्याच पावसात जिल्ह्यात दोन जण बुडाले.

इंदिरा नगर ओझर येथील राहुल जिभाऊ बागुल (वय 9) हा गुरुवारी वटपौर्णिमा महिलांची पूजा पाहण्यासाठी व नदी पल दि.7 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता तालुक्यात व चहार्डी येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

अडीचतास मुसळधार पाऊस झाल्याने गावातील मधोमध जाणारी चंपावतीला मोठा पूर आला. या नदीच्या काठावर असलेला झाडण चौकातील सलूनचे दुकान बंद करून पलीकडच्या काठावरील खालच्या गावात पुलावरून घरी येत असतांना तुषार गुलाब सोनवणे (वय 26) हा अविवाहीत तरुण पूर आल्याने वाहून गेला.

तुषार हा नाभिक समाजातील कार्यकर्ते गुलाब सुकलाल सोनवणे (न्हावी) यांना तो एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई,वडील व तीन बहिणी असा परिवार आहे.

गुलाब सोनवणे हे देखील सलून दुकानाचा व्यवसाय करत असून ते भूमिहीन कुटुंब आहे.त्यांची कौटुंबिक परिस्थिती गरिबीची आहे.

तुषारचा पुरात वाहून मृत्यू झाल्याच्या घटनेची वार्ता सकाळी गावात वार्‍यासारखी पसरल्याने चहार्डी गावात सर्वत्र शोककळा पसरली.

चंपावतीवर गावापासून एक किलोमीटर अंतरावर दक्षिण बाजूला असलेल्या के.टी.बंधार्‍याजवळ काटेरी झुडपात तुषारचे शव आढळून आले.

 

LEAVE A REPLY

*