Type to search

धुळे

दोंडाईचा ‘रावल राजगढी’ म्हणजे

Share

सामान्यांचे माहेरघर!

सहकार महर्षी परमपूज्य, तीर्थरूप दादासाहेब रावल यांचे कर्तृत्व व यशोगाथा सांगणे म्हणजे हाताने सूर्य झाकण्यासारखे असले तरी आज त्यांचे आदर्श, समाजाप्रती कर्तव्यनिष्ठा, समाजहित जोपासत अथकपणे केलेले कष्टांचे स्मरण म्हणजे आदरांजली होय. खेड्याचा विकास, नाविन्याचा ध्यास, गरिबीचे उच्चाटन हे ध्येय डोळयापुढे ठेवून सर्वच क्षेत्रात दैदीप्यमान कार्य करून जनहितासाठी झटणार्‍या दादासाहेबांचा वारसा आम्हा दोंडाईचावासीयांना लाभला हे आमचे महत्भाग्यच.

एखाद्यास शब्द देतांना भान ठेवावे व दिलेल्या शब्दांची पूर्ती बेभान होऊन करावी हे स्वकर्तृत्वाने दाखवून आपले सुपुत्र व नातवंडासही तोच वारसा देणारे दादासाहेब यांची गढी म्हणजे समाजसेवा,उत्कृष्ट-आदर्श राजकारण, योग्य न्याय व माणुसकीचे मंदिर होय. त्यांचे सुपुत्र, स्नुषा, नातवंडे हे जनहित, जनसेवा, कर्तव्याप्रती निष्ठा व भारतीय समाज व्यवस्थेचे सारे रीतीरिवाज जपणारे आदर्शच होय. लौकिकप्राप्त असे दादासाहेब आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने गढीचा इतिहास सुवर्णाक्षरांनी कोरून गेलेत. मानवतेचे पुजारी, सकलांना सांभाळून घेणारे गरिबांचे कैवारी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या पिढीस माणुसकी, जनसेवेचे बाळकडू पाजत प्रेरणास्थानी आहेत. आजही दादासाहेब रावल परिवाराचे कार्य व सर्वच क्षेत्रातील नेत्रदीपक यशाच्या रुपात वास करीत आहेत.

दोंडाईचावासीयांचे उद्धारकर्ता, शिक्षण क्षेत्रातील हजारो सेवकांचा पोशिंदा असणारे दादासाहेब आपले कर्तृत्वशिल्प स्वकर्तृत्वाने कोरून माणसे जोडण्याचा व समाजबांधणीचा आदर्श ठेवून ज्ञानज्योती घराघरात तेवत ठेवत

जे का रंजले गांजले

त्यासी म्हणे जो आपुले

तोची साधू ओळखावा

देव तेथेची जाणावा

हे तुकोबांचे तत्त्व आचरणाचा वारसा गढीरूपी माणुसकीच्या मंदिरात ठेवून गेले. आजही धनाढ्य दादासाहेब रावल यांची स्वप्नपूर्ती गढी आम्हा सामान्यांचे माहेरघरच. जेथे कसलेच भय नाही पण आधार आहे. अशा कर्तृत्वाचे महामेरू,तीर्थरूप दादासाहेब, ज्यांना कैलासवासी शब्द लावत नाहीत. कारण आजही अविरत समाजकार्य, जनहित व्रतात वास करीत आहेत.

-लतिका चौधरी, दोंडाईचा

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!