Type to search

धुळे

दोंडाईचा येथे शस्त्रपूजन व रावण दहन

Share

दोंडाईचा । येथील रावल संस्थानात (रावल गडी) दरवर्षी परंपरेनुसार शाही दसरा साजरा करण्यात आला. शस्त्र पूजन व रावण दहन करण्यात आले. विजयादशमी निमित्ताने विकासरत्न सरकार साहेब रावल, माजी आमदार बापूसाहेब रावल, राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, विक्रांतसिंह रावल यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन व रावण दहन करण्यात आले.

या सोहळ्याची सुरूवात रावल गढीवरून सनई चौघडा व ढोल-ताशाच्या गजरात मशाल पेटवून शहरातील नागरिकांसह सीमोल्लंघन करण्यात आले. यानंतर रावल परिवारासह सर्वांनी मांडळ रोड येथील कास्मिर्‍या मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली व मंत्रोच्चारात शमी वृक्षाचे पूजन करण्यात आले. तसेच कास्मिर्‍या मारुती मंदिराच्या प्रांगणात रावण दहन समितीतर्फे उभारण्यात आलेल्या रावणाच्या 25 फूट पुतळ्याचे मंत्री जयकुमार रावल, विकासरत्न सरकार साहेब रावल, विक्रांत रावल यांनी दहन केले. दरम्यान, मिरवणुकीवर नागरिकांनी शहरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली. या कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रावण दहन समितीचे आयोजक अशोक चौधरी, महेंद्र गीते, कृष्णा नगराळे, फकिरा चौधरी संजय मराठे, पंकज चौधरी, निखिल जाधव तसेच दोंडाईचा शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी व शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!