Type to search

धुळे

दोंडाईचा येथे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ

Share

दोंडाईचा | दोंडाईचा येथील नंदुरबार चौफुली येथे छत्रपती शिवाजी महाराज व राऊळ नगरला वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले.

प्रादेशिक पर्यटन विभातर्गत १६ कोटीच्या निधीतून नंदुरबार चौफुली ते गर्ल्स हायस्कूल पर्यंत राजपथ साकारत असून येथे भव्यदिव्य रस्ता, दुभाजक, शोभेची झाडे, लहान मुलांना खेळणे, फुड स्टॉल, विद्युत रोषणाई यासह नंदुरबार चौफुली येथे छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा साकारणार आहे आज त्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच मालपुर चौफूली येथील राऊळ नगर येथे वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे त्या कामाचे ही भूमीपूजन आज राज्याचे अन्न व औषध, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल व खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, उपनगराध्यक्ष प्रदीप कागणे, जि. प. चे कामराज निकम, बांधकाम सभापती चिरंजीवी चौधरी, भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, विक्रम पाटील, निखिल जाधव, किशनचंद दोधेजा, छोटू मराठे, कृष्णा नगराळे, लायन्सचे राकेश अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, नगरसेवक संजय अग्रवाल, रवी उपाध्ये, डूग्गरचंद बाफना, माजी नगरसेवक जितू गिरासे, नथ्थू धनगर, मनोज तेले, विजय मराठे, हितेंद्र महाले,जितेंद्र गिरासे, सुफियांन तडवी, भूषण बागल आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जितेंद्र गिरासे तर प्रास्ताविक बांधकाम अभियंता शिवनंदन राजपूत यांनी केले .

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!